साहसी जल पर्यटनाचा आनंद देण्यासाठी “पर्यटनक्षेत्र गणपतीपुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यामतून “गणपतीपुळे बोट क्लब ganpatipule boat club
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,यांच्या उपस्थितीत काल गणपतीपुळे बोट क्लबची घोषणा झाली
रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या कल्पनेतून व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि खा. विनायक राउत यांच्या पाठपुराव्याने पर्यटनक्षेत्र गणपतीपुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यामतून “गणपतीपुळे बोट क्लब” झाला आहे.यासाठी मपविमचे सल्लागार डॉ सारंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या बोट क्लबची निर्मिती करण्यात आली आहे. हा बोट क्लब म्हणजे पर्यटकांसाठी एक मोठी पर्वणी ठरेल असा अंदाज आहे
गणपतीपुळे बोट क्लब हे मपविम पर्यटन निवासामधील कोकणी हट या परिसरात १ एकर जागेवर विकसित करण्यात आलेले आहे. या मधील ९८% जागा नारळाची बाग आणि वाळूच्या किनाऱ्याने व्यापलेली आहे. या बोट क्लब मध्ये साहसी जल पर्यटनाला येण्याऱ्या पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. बोट क्लब मध्ये स्वागत आणि माहिती कक्ष, कार्यालय, अद्यावत तिकीट काउंटर तयार करण्यात आलेले आहे. पर्यकांसाठी स्वच्छता आणि स्नान गृहाची सोय देखील करण्यात आली आहे. तसेच नैसर्गिक साधनांचा वापर करून बीच श्याक उभारण्यात आलेला आहे. तेथे पर्यटक समुद्र दर्शनाचा आनंद घेऊ शकतात
या बोट क्लब मध्ये सध्या ९ प्रकारचे साहसी जल पर्यटनाचे प्रकार उपलब्ध होत आहेत. त्यासाठी ८ यांत्रिकी तसेच १७ बिन यांत्रिकी बोटी आहेत. भविष्यात महामंडळ पर्यटकांना अधिक नाविन्यपूर्ण साहसी जल पर्यटनाची आकर्षणे उपलब्ध करून देणार आहे. बोट क्लब मधील सर्व कर्मचारी प्रशिक्षित आणि अनुभवी असल्याने दर्जेदार साहसी जल पर्यटनाबरोबर पर्यटकांच्या सुरक्षिततेला देखील प्राधान्य देण्यात आले आहे. पर्यटकांना Book My Show App च्या माध्यमातून आगाऊ बुकिंग करता येणार आहे
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटकांना उच्च दर्जाच्या साहसी जलपर्यटनाचा अनुभव देण्यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सुविधा निर्माण करीत आहे. या सुविधांमुळे गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साहसी जल पर्यटनाचा अनुभव मिळणार आहे. “
www.konkantoday.com