
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने कुंभार्ली घाटातील सोनापात्रा ठिकाण बनतेय मृत्यूचा सापळा
शिरगाव ( ता चिपळूण ) :- गुहागर -विजापूर मार्गावरील कोकण व पश्चिम महाराष्ट्र याना जोडणारा कुंभार्ली घाटातील सोनापात्रा याठिकाणी रस्ताच खचल्यामुळे मोठं मोठं अपघात होऊन वाहतूक ठप्प होते याबाबत अलोरे शिरगाव पोलीस यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला असला तरी संबंधित खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का असा सवाल उपस्थित झाला आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की कोकण व प महाराष्ट्र यांना जोडनारा कुंभार्ली घाट हा नागमोडी वळणाचा आहे 18 किलोमीटर अंतराच्या घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे तर सर्वात मोठा खड्डा सोनापात्रा याठिकाणी पडला आहे पोफळी पासून घाट सुरू होता आणि सोनापात्रा येथील एका मोठ्या वळणावर आल्यावर अर्धा घाट चढला जातो असे बोलले जाते पण त्याचठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता पूर्णपणे खचला आहे त्यामुळे बऱ्याचदा ३० ते ५० टन च्या गाड्या याठिकाणी फसतात काही काही वेळा जागेवर पलटी होऊन अपघात होतो तर अनेकदा गाड्या त्या खड्यात फसतात त्यामुळे अनेकदा वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन घाट बंद होतो
काही दिवसांवर गणपती सण येऊन ठेपला आहे त्यातच जिल्ह्यातील आंबा घाट,कशेडी घाट बंद पडला तर कुंभार्ली घाटामार्ग वाहतूक करण्यात येईल त्यावेळी अशी परिस्थिती असेल तर कुंभार्ली घाट सुद्धा बंद पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी वाहनचालक करीत आहेत मात्र यासर्व विषयात स्थानिक पुढारी गप्प का ? असा सवाल उपस्थित झाला आहे .
www.konkantoday.com
