
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमासोबत इतर अवांतर असलेली तब्बल ४२६ टन पुस्तके बालभारती रद्दीत काढणार
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमासोबत इतर अवांतर असलेली तब्बल ४२६ टन पुस्तके बालभारती रद्दीत काढणार आहे. यासाठी एक निविदा काढण्यात आली असून ती वादात सापडली आहे.
कोरोना काळात ऑफलाईन शिक्षण बंद होते, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मागील वर्षी आणि यंदाही पुस्तके मिळालेली नाहीत, असे असताना इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तके रद्दीत काढून ती बाद केली जाणार असल्याने त्यावर शिक्षक आमदार नागो गाणार यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने आक्षेप घेतला आहे.
मागील वर्षी आणि यंदाही शाळा सुरू होवू शकल्या नाहीत. त्यात लाखो विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके गेली नसताना ४२६ टन पुस्तके रद्दीत कशी काढली जात आहेत, इतकी मोठी पुस्तके राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचवली गेली नाहीत. यासाठी कोण जबाबदार आहे, असे प्रश्न आता उपस्थित होवू लागले आहेत.
www.konkantoday.com