१७ व १८ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
रत्नागिरी – भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार १७ व १८ ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com