
जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा शिक्षक बदल्या व समुपदेशन प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार -जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या नियमानुसार करण्यात आलया असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आंतर जिल्हा बदलीने जाणार्या शिक्षकांची यादी ५ तारखेला जिल्हा परिषद कार्यालयाला प्राप्त झाली. त्यानंतर ९ तारखेला उपसचिव ग्रामविकास खात्याचे पत्र आले त्यानुसार या शिक्षकांना त्याच दिवशी कार्यमुक्त करण्यात यावे अन्यथा संबंधित शिक्षणाधिकारी त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना या प्रकरणी जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई करणेत येईल असे नमूद करण्यात आले आहे.पवित्र प्रणाली अंतर्गत होणाऱ्या शिक्षणसेवक भरती प्रक्रियेसाठी रिक्त पदाची जाहिरात देताना १९-२०आंतर जिल्हा बदलीने या जिल्हा परिषदेकडून अन्य जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या शिक्षकांमुळे रिक्त होणाऱ्या पदांचा देखील समावेश करण्यात आला होता. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले सदर शिक्षकांना कार्यमुक्त केल्याशिवाय पवित्र प्रणालीद्वारे नवीन नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना पदस्थापना देणे शक्य नव्हते तसेच ४ तारखेच्या पत्रातील सूचनेनुसार अन्य जिल्हय़ांमध्ये होणार्या समुपदेशन प्रक्रियेमध्ये सदर शिक्षकांना सहभागी होण्याची संधी मिळणे आवश्यक होते.त्यामुळे सदर आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले.११ तारखेच्या समुपदेशन प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील सर्व शुन्य शिक्षकी शाळांना शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले. समुपदेशनामध्ये शिक्षकांना पदस्थापना देतांना जास्त पटाच्या शाळांना प्रथम प्राधान्य देण्यात आले.त्यामुळे मोठ्या पटाच्या शाळामधील सर्व रिक्त पदे भरण्यात आली.तसेच जिल्ह्यातील रिक्त पदांचा समतोल राखणेत आला. सदर प्रक्रियेपूर्वी जिल्ह्यातील रिक्त पदांची टक्केवारी १५.१६ होती व आता समुपदेशन प्रक्रियेनंतर सदरची टक्केवारी ९.३३इतकी झाली आहे.त्यामुळे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवणे शक्य झाले आहे. अशाप्रकारे सदर संपूर्ण समुपदेशन प्रक्रिया ही विद्यार्थी, शिक्षक व प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरली आहे.ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे चित्रीकरण करून करण्यात आली.यावेळी शिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चर्चेनंतर महिलांना प्राधान्य देण्याबाबत त्यांनी एकमताने सहमती दर्शवली तसे त्यांनी लेखी पत्र मुख्य कार्य अधिकारी यांना दिले सर्व महिलांचे समुपदेशन पार पडल्यानंतर सदर ७१ शिक्षकांपैकी ६१शिक्षकांनी होकार दिला त्यांच्या पसंतीनुसार समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली.यामुळे या सर्व प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शकपणे झाल्या असून यासाठी सर्व सन्मानीय सदस्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली आहे.दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शिवसेना पदाधिकार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याला विश्वासात घेत नसल्याची तक्रार केली होती. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार या सर्व प्रक्रियावरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे व नियमाप्रमाणे केल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.