शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांच्या पुढाकारातून दुरावस्था झालेल्या सडेजांभारी रस्त्यावरील खड्डे भरले
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी राजकारणाला सामाजिकतेची जोड देवून नागरिकांना अभिप्रेत असलेले काम सुरू आहे. आ. भास्करराव जाधव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी ही मोहीम हाती घेतली होती तालुक्यातील सडेजांभारी सातवीण फाटा ते खालचीवाडीमार्गे देऊळवाडी रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगूनही दुर्लक्ष झाल्याने निर्मल ग्रामपंचायत सडेजांभारीच्यावतीने तालुकाप्रमुख बाईत यांना रस्त्याच्या दुरावस्थेबाबत पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेवून या मार्गावरील खड्डे ग्रामस्थांच्या सहकार्याने मातीने बुजविण्यात आले. बाईत यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. www.konkantoday.com