रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ४ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये १ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ४ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
रत्नागिरी ग्रामीण येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून असलेले शरद पवार यांची ठाणे शहर याठिकाणी बदली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्नागिरी नियंत्रण कक्ष येथे असलेले शांताराम महाले यांची कोकण परिक्षेत्र येथे बदली झाली आहे तर पैरवी अधिकारी जिल्हा कोर्ट येथे असलेले रोहन दणाणे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची सांगली येथे बदली झाली आहे. लांजा येथे कार्यरत असणाऱ्या श्वेता पाटील यांची कोल्हापूर परिक्षेत्र येथे बदली झाली आहे तर संगमेश्वर येथे कार्यरत असणाऱ्या प्राची पवार यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button