पुरग्रस्ताचे चिपळूण सर्वे, डीबीजे मुलांचे योगदान
पूरग्रस्त चिपळूण शहर आणि परिसरातील गावांतील पूरग्रस्त कुटुंबांचा घरोघर जाऊन सर्वे करण्याची संकल्पना राष्ट्र सेवादल राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॅा. गणेश देवी यांनी चिपळूण येथील संवाद बैठकीदरम्यान डीबीजे प्राचार्य डॅा. संजय घवाळे यांचे कडे व्यक्त केली आणि प्रा. गवाळे सर यांनी तब्बल ४० मुलांचे पथक या सर्वे कामासाठी तैनात केले. आज ही ४० मुले पूरग्रस्त चिपळूणच्या खेड्यापाड्यात अत्यंत दुर्गम भागात जाऊन या कुटुंबांचे सर्वे गुगल फॅार्मवर अचूकपणे नोंदवत आहेत.
पूरपरिस्थिती नंतर चिपळूण भागात संपूर्ण महाराष्ट्रातून फार मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य , पाणी बाटल्या, कपडे, चादर, औषधे , खाद्यपदार्थ यांची मदत आली. यांत राष्ट्रसेवादलाच्या महाराष्ट्रातील विविध भागातून आणि सल्लग्न संस्थातून मोठ्या प्रमाणात मदत आली व त्याचे वाटप अगदी नियोजनबध्दपणे करण्यात आले. या तात्पूरत्या मदतीच्या पलिकडे जाऊन कोकणच्या पूर प्रश्नावर मुलभूत कारणे शोधून त्यावर आंतरराष्ट्रीय संशोधन आणि परिमाण विचारातून काय पर्याय आणि उपाय योजना होऊ शकतात यासाठी डॅा गणेश देवी यांनी अनेक पर्यावरण अभ्यासकांना सोबत घेत कोकण डिझास्टर प्लॅनचे काम सुरु केले आहे. यासाठी पूरग्रस्त भागातील कुटुंबांचा वास्तव सर्वे फार महत्वाचा आहे.
सध्या डीबीजे च्या सहकार्याने हा महत्वपुर्ण सर्वे सुरु आहे. यांत या कुटुंबां समोरील समस्या, आलेली मदत, मदत करणारे , घटक, गरजा, आणि निरिक्षणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आजपर्यंत ५०० पूरग्रस्त कुटुंबांचा सर्वे झाला असून दोन हजार कुटुंबांचा सॅम्पल सर्वे अपेक्षित आहे. यांत काविळतळी, मार्कंडी, पिर्शरामनगर, खेर्डी, मालेवाडी, गोवळकोट रोड, कळंबस्ते, बुध्द वाडी, खालची पेठ, रेल्वे फाटक, शंकरवाडी, कुंभारवाडी पेढे, चिपळूण कांगणेवाडी, कोंढेमाड, उक्ताड, शिरगाव, बैकरवाडी, दादर मोहल्ला, बापट आळी, चिपळूण शहर बाजारपेठ याचा समावेश आहे.
याच वेळी डॅा देवी यांनी कोकणातील पर्यावरण, व्यवस्थापन, प्रशासन क्षेत्रात काम करणार्या अभ्यासकांची नुकतीच ॲानलाईन मिटींग घेतली. यांत रायगड ते सिंधुदुर्ग आणि काही तण लोकांचा समावेश होता.
अशा पूर परिस्थितीत जागतिक पातळीवर नवसंशोधीत कोणत्या प्रकारच्या उपाययोजना होतात या बाबतही संशोधनाचे काम काही तज्ञ मंडळी करत आहेत. यासाठी मुलभूत माहिती म्हणून हा सर्वे महत्वपुर्ण भूमिका बजावणार आहे.
डीबीजेची मुले आज खेड्यापाड्यात चिखल माती तुडवत पोहोचत आहेत. त्यांचे विशेष कौतुक आहे. या संदर्भात काही भागातील सर्वे झाला नसल्यास सर्वे कोॲार्डीनेटर प्रा. ज्ञानोबा कदम +91 99230 73219
यांना संपर्क करु शकता.
www.konkantoday.com