
अवकाळी पावसामुळे लहान आंबा उत्पादक अडचणीत
मे महिन्याच्या पूर्वार्धात हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील लहान आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून स्थानिक बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढते. यंदा या कालावधीत पावसाने वादळी वार्यासह किमान पाच दिवस हजेरी लावल्याने स्थानिक बाजारपेठेत आंब विकणार्या स्थानिक शेतकर्यांचा आंब्याचा भाव पडला आहे. मे महिन्यात तयार होणार्या आंबा पिकास स्थानिक पातळीवरच उत्तम बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकर्याला विनासायास पैसे मिळून जातात. यंदा मात्र पावसाने तालुक्यात वारंवार हजेरी लावल्याने आंबे काढणीआधीच अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. वादळामुळे आंबे गळून पडले व पाऊस सुरू झाल्याने फळात पाणी गेल्याचे कारणाने दर पडला आहे. www.konkantoday.com