पर्यटन क्षेत्राला सावरण्यासाठी देशांतर्गत पर्यटक हा एकमेव आधार, तज्ज्ञांचे मत
कोरोनामुळे जगभरातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. बहुतांश देशांनी अद्यापही आपल्या सीमा पूर्णतः खुल्या न केल्याने येत्या काही महिन्यांत हे क्षेत्र उभारी घेण्याची शक्यताही धूसर आहे. त्यामुळे या कठीण काळात तग धरून राहण्यासाठी देशांतर्गत पर्यटनवाढीवर भर देणे हा एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.कोरोनाकाळात पर्यटनाचा ट्रेंड बदलला आहे. पर्यटक आता देशांतर्गत पर्यटनाला पसंती दर्शवू लागले आहेत. बहुतांश नागरिक घरापासून जवळ म्हणजे ३०० ते ३५० किलोमीटरच्या आत भ्रमंती करण्यास उत्सुक आहेत. गोवा, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरला भेट देणाऱ्यांची संख्या या काळातही नोंद घेण्याजोगी आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला सावरण्यासाठी देशांतर्गत पर्यटक हा एकमेव आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यटक आता चैनीपेक्षा सुरक्षेला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंग आणि तंत्रज्ञानाधारित सुरक्षा साधनांसह प्रवास करण्यास बरेच जण प्राधान्य देत आहेत.
www.konkantoday.com