हिट अ‍ॅण्ड रन घटनेतील अपघातग्रस्तांसाठी तातडीच्या नुकसानभरपाईची रक्कम आठपटीने वाढवण्यात येणार

रस्त्यावर एखाद्या अज्ञात वाहनामुळे अपघात झाला आणि या वाहनाची माहिती मिळू शकली नाही, (हिट अ‍ॅण्ड रन) तर अशा घटनेतील अपघातग्रस्तांसाठी तातडीच्या नुकसानभरपाईची रक्कम आठपटीने वाढवण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून यात दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे प्रस्तावित आहे.
देशभरातील अपघातांत ‘हिट अ‍ॅण्ड रन’च्या घटनांचाही मोठय़ा प्रमाणात समावेश असतो. अपघात झाल्यानंतर वाहनचालक पळ काढतो. अशा वेळी अपघातग्रस्त किंवा त्याच्या कुटुंबीयांना उपचारासाठी तात्काळ मोठी मदत मिळावी या उद्देशाने नुकसानभरपाईत वाढ करण्यात आली.
सध्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना २५ हजार आणि गंभीर जखमी झाल्यास १२ हजार ५०० रुपये मिळतात.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button