सैतवडे येथील लेन मोहल्लात उच्च दाबाच्या वीज वाहीन्या तुटून रस्त्यावर
सैतवडे येथील लेन मोहल्ला मध्ये आज सकाळी भलंमोठं झाड पडल्याने वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर पडलेल्या आहेत. यामुळे येथील नागरीकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे शिवाय त्यामुळे रस्ताही बंद झालेला आहे.
या पुर्वी सैतवडे गावातील संपूर्ण विजवाहीन्या बदलण्याची मागणी या भागातील लोकांनी संबंधित अधिकाऱ्यांना, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधीना ही याबाबत निवेदन व माहिती देऊन या भागातील विजवाहिन्या आज पर्यंत बदलण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या भागातील लोकांमध्ये नाराजी आहे.
आज सकाळी विजवाहिनी तुटली त्या वेळी विज प्रवाह चालू होता, जर लोकांची वर्दळ चालू असती तर जीवीत हानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण? वीज वाहिनी तुटल्याची समजताच या भागातील लोकांनी त्वरित वीज कर्मचा-यांना कळवून मुख्य विजवाहिनी बंद करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. गावातील तरुण नागरिकांच्या मदतीने एकच वीज कर्मचारी काम पूर्ण करताना दिसत आहे
www.konkantoday.com