लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करून मासिक पास घेणाऱ्यांची एकूण संख्या १ लाख २९ हजार ८८३ झाली

दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाही रविवार १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तशी तुरळक राहिली. सोमवारी (पारसी नवीन वर्ष) सुट्टी असल्याने ही संख्या कमीच असेल, असा अंदाज रेल्वेकडून व्यक्त के ला जात आहे. मंगळवारपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांचीही लोकल प्रवासात भर पडू शकते.
तरीही मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारपासूनच लोकल फे ऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत (दुपारी ४ पर्यंत) लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करून मासिक पास घेणाऱ्यांची एकू ण संख्या १ लाख २९ हजार ८८३ झाली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button