राजापूर तालुक्यात रिफायनरी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षाने घ्यावी, -रिफायनरी विरोधी संघटनेचे शिवसेना जिल्हाप्रमुखांना निवेदन
नाणार येथील रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, पंचक्रोशीतील ९० टक्के ग्रामस्थांचा या रिफायनरीला विरोध आहे. प्रदूषण विरहित प्रकल्प आणून स्थानिकांना रोजगार द्या, मात्र प्रदूषणकारी प्रकल्प नको, असा तीव्र विरोध दर्शविणारे निवेदन देवाचे गोठणे, गोवळ, शिवणेखुर्द आणि धाऊलवल्ली येथील रिफायनरी विरोधी संघटनांनी (ता. १४) रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना दिले.राजापूर तालुक्यात रिफायनरी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षाने घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहेशिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली.आहे
www.konkantoday.com