रत्नागिरी शासकीय रुग्णालयाचा धक्कादायक कारभार ,मृत महिला रुग्णाच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरीला
कोरोनामुळे अनेकांचे जवळचे नातेवाईक मृत्यू हाेत असतानाच गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा शासकीय रूग्णालयातील एक गंभीर गैरप्रकार उघड झाला आहे या रुग्णालयात उपचार घेत असताना मृत झालेल्या कराेना महिला रुग्णाच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केल्याने खळबळ उडाली आहे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार रत्नागिरीसारख्या ठिकाणी सुरू झाल्याने सध्या रुग्णालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे याबाबत पाली येथील राहणाऱ्या समीक्षा पाटील यांनी तक्रार अर्ज केला असून या अर्जात म्हटल्याप्रमाणे त्यांची आजी सुलोचना पाटील या करुणा पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रत्नागिरी येथील उद्यमनगर महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले त्यावेळी त्यांच्या उजव्या हातात दोन सोन्याच्या बांगड्या होत्या उपचार चालू असल्याने त्या त्यांच्या हातातच होत्या त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे कळविण्यात आले त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र त्यावेळी त्यांच्या हातात असलेल्या सोन्याच्या बांगड्या नातेवाईकांना मिळाल्या नव्हत्या ही गोष्ट त्यानी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कानावर घालू नही त्या त्यांना मिळाल्या नव्हत्या शेवटी समीक्षा यांनी १० तारखेला जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावाने लेखी अर्ज करून वस्तुस्थिती कानावर घातली व बांगडय़ा मिळवून द्याव्यात अशी मागणी केली अन्यथा पोलीस स्थानकात तक्रार करावी लागेल असे म्हटले होते या घटनेमुळे खळबळ उडाली रुग्णालय प्रशासनाने याबाबत चौकशी केली असता एका कंत्राटी कामगाराने हा प्रकार केल्याचे कळते त्यांच्याकडून मालही हस्तगत झाल्याचे कळत आहे मात्र याबाबत अद्यापही पोलिसांत तक्रार झाली नसल्याचे कळत आहे
www.konkantoday.com