मासेमारीला सुरुवात झाल्यामुळे पुन्हा हर्णै बंदर गजबजले
वादळ आणि पावसाळी वातावरणामुळे यावर्षी मासेमारीचा मुहूर्त लांबला हाेता. वादळी वातावरण निवळण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दापाेली तालुक्यातील हर्णै बंदरातील मच्छीमारांनी समुद्राचा अंदाज घेऊन दोन दिवसांपासून मासेमारीला सुरुवात केली आहे.
हर्णै बंदर हे मासळी खरेदी-विक्रीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे बंदर आहे. सुमारे ८०० ते ९०० नौका या बंदरात मासेमारी करतात. त्यामुळे येथे रोजच मोठा मासळी लिलाव भरतो. जून, जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी असल्यामुळे हर्णै बंदरात पूर्ण शुकशुकाट असतो; मात्र आता मासेमारीला सुरुवात झाल्यामुळे पुन्हा हर्णै बंदर गजबजले आहे. अद्याप सर्व नौका मासेमारीला गेल्या नसल्यामुळे बंदरात मासळीचे प्रमाण कमी असले
www.konkantoday.com