पदाचा गैरवापर करून जर कोणाला त्रास देत असेल तर तो त्रास ताबडतोब थांबविला गेला पाहिजे”, -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, रस्त्यांच्या कामात शिवसैनिक अडथळा आणतात यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, मी काल बातमी वाचली आहे. तो आरोप असून त्यामध्ये तथ्य आहे की नाही ते तपासून पाहण्याची गरज आहे. मागील ३० वर्षांपासून समाजकारणात आणि राजकारणात काम करीत आहे. त्या दरम्यान नेहमी सांगत आलो आहे की, हा जनतेचा पैसा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला गेला पाहिजे. तो दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी पदाचा गैरवापर करणाऱ्यांना देखील सुनावले आहे. “जर ठेकेदार चांगल काम करत असेल आणि काही जण राजकिय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करून जर कोणाला त्रास देत असेल तर तो त्रास ताबडतोब थांबविला गेला पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.
www.konkantoday.com