नितीन गडकरी यांचं पत्र माध्यमांसमोर का आलं?आमदार भास्करराव जाधव यांचा सवाल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले होते त्यावरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. गडकरींच्या पत्रावर आता शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली असून नितेश राणे यांच्या एका कृत्याची यावेळी त्यांनी आठवण करुन दिली आहे. तसेच गडकरी मुख्यमंत्र्यांना फोन करुन बोलू शकले असते, त्यांचं पत्र माध्यमांकडे कसं आलं? असा सवालही यावेळी भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवसैनिकांची तक्रार केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
नितीन गडकरी यांचं पत्र माध्यमांसमोर का आलं? असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्गामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आधिकाऱ्यांवर चिखल ओतला होता? याची आठवणही भास्कर जाधव यांनी करुन दिली आहे
www.konkantoday.com