जाती-पातीची बंधने तोडून ५१ जणांनी केला आंतरजातीय विवाह
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला २५ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेल्या ५१ जोडप्यांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी दिली.
पंचायत समितीचे माजी सदस्य जाकीर शेकासन यांनी अनुदान मिळावे याकरिता पाठपुरावा केला होता. समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने सदरची योजना सुरू केली आहे.
www.konkantoday.com