राज्यसरकार आग्रह धरत नाही तुम्ही का धरता? असं म्हणत राज्यपालांनी गुगली टाकली

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रीय ध्वजवंदन केले. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील नेते शरद रणपिसे इत्याही उपस्थिती होते. राज्यपाल मान्यवरांच्या भेटी घेत असताना शरद रणपिसे यांनी राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्ती बाबत विचारलं.अजित पवार तेथेच उपस्थित होते. यावेळी राज्यपाल म्हणाले की, अजित पवार सोबत आहेत. ते माझे मित्र आहेत. राज्यसरकार आग्रह धरत नाही तुम्ही का धरता? असं म्हणत त्यांनी गुगली टाकली.
अजित पवारांनी हसत हसत आज स्वातंत्र्य दिन आहे या विषयावर नंतर बोलेन असं म्हणत राज्यपालांनी टाकलेला बॉल सोडून दिला. पण, याच मुद्द्यावर खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपालच म्हणत आहेत सरकार आग्रह करत नाही. याचा अर्थ आघाडी सरकारच्या नेत्यांत समन्वय नाही . त्यामुळे तुम्ही काय ते समजून घ्यावं असं बापट म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button