भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीसाठी रणशिंग फुंकले
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीसाठी रणशिंग फुंकले आहे. पडळकर यांनी येत्या २० ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगाडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे.
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलडागा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.
www.konkantoday.com