
गुजरात आणि तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर आधुनिक स्टील नौका बांधणी केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात व्हावे
गुजरात आणि तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही खोल समुद्रात मासेमारी करू शकणार्या आधुनिक स्टील नौका बांधणी केंद्र या शासनाच्या योजनेची अंमलबजावणी शासनाने करावी, अशी मागणी जिल्ह्यातील मच्छिमारांच्या दोन्ही संघटनांनी केली आहे. या दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्यांची या संदर्भात महत्वाची बैठक झाली. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू करून घेण्यावर बैठकीत एकमत झाले.
मच्छिमारांना या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून ५० टक्के, तर राज्य शासनाकडून २० आणि बँक कर्ज २० टक्के आणि १० टक्के लाभार्थी या प्रमाणे अर्थसहाय्य होते. परंतु प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी गुजरात आणि तामिळनाडू राज्यात सुरू आहे. त्यामुळे या राज्यातील मच्छिमारांना आर्थिक स्तर उत्तम आहे. शासनाला परकीय चलन मिळवून देत असल्याचे मच्छिमार नेते नासीर वाघू व जावेद होडेकर यांनी याबाबत सांगितले.
www.konkantoday.com