पण रत्नागिरी पोलिसांनी लोकांचा हा समज खोटा तर ठरवलाच
अनेकवेळा मोबाइल चोरीला जाण्याच्या किंवा हरवण्याच्या घटना आपण सतत ऐकत असतो एखाद्याचा मोबाइल चोरीला वा हरवला अथवा गहाळ झाला तर तो पोलिसांकडे एक औपचारिकता म्हणून तक्रार देतो पण ताे सापडेल अशी खात्री वाटत नसल्याने आशा सोडून देतो पण रत्नागिरी पोलिसांनी याठिकाणीदेखील अतिशय चांगली कामगिरी बजावत लोकांचा हा समज खोटा तर ठरवलाच पण सापडलेले १८ मोबाईल संबंधितांना परत करून स्वातंत्र्यदिनी भेटच दिली आजचे युग हे मोबाइलचे युग म्हंटले जाते अत्यंत निकडीची आणि सातत्याने वापरली जाणारी ही वस्तू असल्याने तो मोबाईल अनेकदा हरवतो गेल्यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील काही प्रमाणात नागरिकांचे मोबाईल हरवले होते त्यानुसार नागरिकांनी आपल्या जवळच्या पोलीस स्थानकात तक्रारी दिल्या होत्या.जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनखाली रत्नागिरी सायबर सेल यांनी तांत्रिक मदत करुन १८ मोबाईल शोधण्यात त्यांना यश आले आहे.
त्यामध्ये चिपळूण ०९,अलोरे ०२, सावर्डे ०१, संगमेश्वर ०२, पूर्णगड ०१ व रत्नागिरी शहर ०३ असे एकूण १८ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. या सर्व अठरा जणांचे मोबाईल स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पोलीस परेड ग्राऊंडवर जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.मोहितकुमार गर्ग व उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते या सर्व १८ जणांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले.
सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री भोमकर, महिला हेडकाॅन्स्टेबल निशा केळकर, पोलीस नाईक अमोल गमरे, पोलीस काॅन्स्टेबल निलेश शेलार, अंजिक्य ढमढेरे व पूजा गायकवाड या सर्व टिम मोबाईल शोधण्यासाठी खुप मेहनत घेतली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेंमतकुमार शहा व पोलीस नाईक रमिज शेख यांनी मोबाईल शोधण्यासाठी तसेच त्या त्या पोलीस स्थानकातील अधिकारी व कर्मचार्यांची मदत सायबर सेलला झाली आहे.
www.konkantoday.com