जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्रांतीगृह इमारतीसाठी निधी मंजूर

राजापूर -अनेक वर्षापासुन आमदार डॉ.राजन साळवी यांचे रुग्णालयांचा नातेवाईकांसाठी जिल्हा शासकीय रुग्णामध्ये विश्रांतीगृह असण्याचे स्वप्न साकार झाले असुन पालकमंत्री नाम.अनिल परब यांनी रुग्णांच्या नातेवाईकांच्या विश्रांतीगृह इमारतीसाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत रुपये १ कोटी २ लाख ५३हजार ६०० इतकी मंजूरी मिळाली आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयामध्ये अनेक सामान्य रुग्ण दाखल होत असतात. परंतु सदर रुग्णांच्या सोबत राहणा-या नातेवाईकांची फार गैरसोय होत असल्यामुळे सदर रुग्णांच्या नातेवाईकांना राहणाची सोय होणासाठी विश्रांतीगृह इमारत होण्यासाठी आमदार डॉ.राजन साळवी यांनी अनेक वर्षापासुन प्रयत्न करत होते. यासाठी आमदार डॉ.राजन साळवी यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सदर इमारतीला निधी मिळाणेसाठी गेली तीन वर्षापसुन प्रयत्न करीत असुन तात्कालीन पालकमंत्री नाम.रविंद्र वायकर यांच्याकडेही मागणी केली होती.

Ratnagiri civil hospital rajan salvi


त्यानंतर कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांची होणारी गैरसोय पाहता नियोजन विकास समितीच्या बैठकीमध्ये आमदार डॉ.राजन साळवी यांनी रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय होणेसाठी विश्रांतीगृह इमातर होण्याची मागणी करुन पालकमंत्री नाम.श्री.अनिल परब यांच्या निदर्शनास आणले होते. त्याअनुषंगाने पालकमंत्री नाम.श्री.अनिल परब तसेच उच्च व तत्रशिक्षण शिक्षण मंत्री नाम.उदय सामंत यांनी सहमती दर्शवून जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत रुपये १ कोटी २ लाख ५३ हजार ६०० इतकी मंजूरी दिली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांच्या विश्रांतीगृह इमारतीसाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत रुपये १कोटी २ लाख ५३ हजार ६०० इतकी मंजूरी मिळाली असुन इतक्या मोठया रक्कमेची मंजूरी मिळाल्याने आमदार डॉराजन साळवी यांचे अनेक वर्षाचे स्वप्न साकार झाले असुन आमदार डॉ. राजन साळवींनी जिल्हा शासकिय रुग्णालय व सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सदर विश्रांतीगृह इमारतीमुळे जिल्हा शासकिय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय दुर होणार असुन सामान्य माणसांना दिलासा मिळणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button