
राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांना लोकप्रतिनिधी कडून धमक्या,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची तात्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत. यात त्यांनी कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांची माहिती मागितली आहे. यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना धमक्या देत महामार्गांची कामं बंद पाडणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे असंच दिसतंय.आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अत्यंत स्फोटक पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे रस्त्याची कामं बंद पडतील, असा थेट इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार-खासदारांकडून विरोध होत असल्याचं गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे.
www.konkantoday.com