
राज्यात कोरोनामुळे १४३ बालकांचे आई व वडील हिरावले तर ४ हजार ९३५ मुलांनी आई किंवा वडिलांचे छत्र गमावले
कोविडच्या संसर्गात दोन्ही पालक गमावलेल्या अठरा वर्षांपर्यंतच्या बालकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने २० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनामुळे १४३ बालकांचे आई व वडील हिरावले तर ४ हजार ९३५ मुलांनी आई किंवा वडिलांचे छत्र गमावले आहे. कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांचा शोध घेताना राज्यात जवळपास तीन हजार महिलांचे पती कोरोनाने हिरावून घेतल्याचे दिसून आले आहे.
www.konkantoday.com