
रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी-वाघजाई संस्थेत अपहार
रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी-हातखंबा येथील वाघजाई विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या लेखापरीक्षणात १५ लाख २३ हजार ७१७ रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. ग्रामीण पोलिसांत संशयित चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिव दत्ताराम सोनू सुवारे (रा. खानू, रत्नागिरी), संदीप दत्ताराम घवाळी (रा. गयाळवाडी, खेडशी), संस्थाध्यक्ष सोनू धर्माजी कळंबटे व गणपत अनंत गोताड अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत घडली.
महेश जाधव (लेखापरीक्षक सहकारी संस्था अलिबाग) यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. www.konkantoday.com