
जलजीवन मिशनमधून प्रत्येक कुटुंबाला नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतीदिन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन -जि प अध्यक्ष विक्रम जाधव
जलजीवन मिशनमधून प्रत्येक कुटुंबाला नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतीदिन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जलजीवन मिशनचा समावेश आहे. त्याचा आढावा अध्यक्ष जाधव यांनी घेतला. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना २०२४ पर्यंत घराघरात पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. प्रत्येक घरात वैयक्तिक जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लीटर प्रतिदिन, गुणवत्तापूर्वक पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com