
चिंद्रवली बोगद्याच्या डोंगरावरील भेगा कोकण रेल्वे मार्गाला धोकादायक नाही
चिंद्रवली बोगद्याची डोंगरावरील भेगा कोकण रेल्वे मार्गाला धोकादायक नसल्याचा निष्कर्ष रेल्वे प्रशासनाच्या प्राथमिक पाहणीनंतर काढण्यात आला आहे. सुरक्षेसाठी तेथे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी- बौद्धवाडीतील डोंगर भाग खचला असून भेगा पडल्या आहेत. तहसील प्रशासनाने पाहणीनंतर तेथील ९ कुुटुंबांना स्थलांतराची नोटीसही दिली. या भेगा कुठपर्यंत गेल्या आहेत, याची पाहणी अधिकार्यांकडून करण्यात आली.
www.konkantoday.com




