आमदार नितेश राणे यांच्या या कामाचे अनुकरण राज्यातील इतर मतदारसंघात होईल -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सारपंचांसाठी मायबाब राज्य सरकार काहीच करत नसेल तर त्यांच्या पाठीशी आमदार नितेश राणे आहेत
Nitesh rane devendra phadanvis
असा चांगला संदेश आज राज्यात गेला आहे.आमदार नितेश राणे यांच्या या कामाचे अनुकरण राज्यातील इतर मतदारसंघात होईल आणि त्याचा फायदा सर्वच सरपंचांना मिळेल असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.भाजपा आमदार नितेश राणे यांनी कणकवली, देवगड, वैभववाडी या आपल्या मतदारसंघातील १६९ सरपंचांना आरोग्य विमा स्वखर्चाने काडून दिला. त्या विमा पॉलिसीचे वितरण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमात श्री.फडणवीस हे ऑनलाईन सहभागी झाले होते
www.konkantoday.com