आता विमान प्रवास करणार्याच्या खिशाला चांगलाच चाट पडणार
कोरोनाकाळात महागाईने सर्वजण बेजार असताना आता विमान प्रवास करणार्याच्या खिशाला चांगलाच चाट पडणार आहे. कारण नागरी विमान मंत्रालयाने विमान भाडय़ाच्या किमान आणि कमाल सीमेच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना भाडेवाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. विमान भाडय़ात आता कमीत कमी दहा टक्के आणि जास्तीत जास्त १३ टक्के भाडेवाढ होणार आहे.
कोरोनाच्या लाटेमुळे देशभरातील लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी विमान प्रवासावर मर्यादा आल्याने सरकारने विमान प्रवासाच्या भाडय़ाची एक सीमा ठरवून दिली होती. फ्लाईटची संख्या घटल्याने सरकारने तसे केले होते. त्यामुळे विमान कंपन्या तिकिटांसाठी जास्त भाडे वसूल करीत होत्या.
www.konkamtoday.com