१४ ऑगस्ट फाळणी स्मृती दिवस’ पाळला जाणार -पंतप्रधान नरेंद्र मोदी
ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या एक दिवस आधी १४ ऑगस्ट १९४७ रोजी देशाची फाळणी झाली होती. फाळणीची पीडा कधीही विसरली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सोशल मीडियावरून आपले दुःख व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी ‘फाळणी स्मृती दिवस’ पाळला जाईल, अशी घाेषणाही त्यांनी केली. ‘फाळणी स्मृती दिवस’ माध्यमातून देशातील ऐक्य आणि मानवीय संवेदनादेखील मजबूत होतील, असा विश्वासही त्यानी व्यक्त केले.
www.konkantoday.com