
रत्नागिरी जिल्हयातील अवैध दारु विक्री बंद करा, रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे
रत्नागिरी जिल्हयातील अवैध दारु विक्री बंद करा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे
गेले दिड वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे सरकारमान्य सर्व मद्य विक्री परवाने
बंद होते. काही कालावधीमध्ये होम डिलिव्हरीने मद्य विक्री सुरु होती परंतु याकाळामध्ये चोरटी देशी विदेशी दारु, हातभट्टीचीगावठीदारु,गोवाबनावटीची दारुविक्री रत्नागिरी जिल्हयात जोरात सुरु झाली आहे. परिणामी रत्नागिरी जिल्हयाचाशासकीय महसूलात खूप मोठी घट झाली आहे. हा महसूल वाढविण्यासाठी शहर व गावा गावातील चोरटे दारु धंदे बंद करणे आवश्यक आहे. पोलिस आणि राज्य उत्पादनशुल्क यांची संयुक्त कारवाई मोहीम राबविणे अत्यावश्यक आहे.तसेच नव्याने सुरु झालेले काही ड्राय डे बंद करुन अनुज्ञाप्ती सुरु ठेवणेआवश्यक आहे. उदाणार्थ होळी, रंगपंचमी. पोटनिवडणूकांमध्ये दुकाने बंद केल्यामुळे मद्य पिणारी गि-हाईक चोरटया दारु धंदयाकडे वळत आहेत. शहर आणि ग्रामिणभागामध्ये चोरटी दारु विक्री करणा-या धंदयाच्या ठिकाणी एक पोलिस किंवा
एक्साईज अथवा होमगार्ड शिपाई शासकीय वेषामध्ये तैनात ठेवल्यास चोरटया धंदयावर जाण्यास गि-हाईक धजावणार नाहीत अश्या पद्धतीने कारवाई केल्यासशासकीय महसूलामध्ये नक्कीच वाढ होईल.
www.konkantoday.com




