तुम्ही नुसते कागदी घोडे नाचवत बसलाय, याद राखा ! चार दिवसात पन्नास टक्के विम्याची रक्कम द्या पहा कोणी दिला हा इशारा chiplun flood insurance
वीस दिवस झाले तरी तुमचा सर्वेच सुरू आहे. महापुरात व्यापारी पुरता उध्वस्त झाला आहे. आणि तुम्ही नुसते कागदी घोडे नाचवत बसलाय, याद राखा तुम्हाला आमची विनंती म्हणा नाहीतर निर्वाणीचा इशारा समजा.. चार दिवसात किमान पन्नास टक्के विम्याची रक्कम द्या नाहीतर तुमच्या कार्यालयांना मनसेचे चिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोकू, तुम्हाला येथे कधीच थारा देणार नाही, असा आक्रमक इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांनी बुधवारी थेट विमा कंपन्यांना दिला. विमा कंपन्यांकडून व्यापार्यांना सहकार्य मिळत नसल्याची ओरड गेले काही दिवस सुरू आहे. कागदपत्रांचा ससेमिरा नाचवून व्यापार्यांना वेठीस धरले जात असल्याच्या असंख्य तक्र्रारी येथील मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे व पदाधिकार्यांकडे आल्या होत्या.
www.konkantoday.com