नुकसान भरपाई पोटी हेक्टरी ६० हजार द्या, कॉंग्रेस पक्षाची मागणी

कोकणात पाच जिल्ह्यात पालघरमध्ये सुमारे १५०० हेक्टर, ठाणे जिल्ह्यात सुमारे ५२०० हेक्टर, रायगड जिल्ह्यात सुमारे ३५०० हेक्टर, रत्नागिरीमध्ये सुमारे २ हजार हेक्टर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९५० हेक्टर क्षेत्र नुकसानगस्ति झाले आहे. शेतकर्‍याला आता दुबार पेरणी करता येणार नाही आणि भात, नाचणीची लावणीही करता येणार नाही. अतिवृष्टीमुळे वेलभाज्या व भाज्यांची रोपेही मरून गेली. त्यामुळे शासनाने शेतकर्‍याला भात, नाचणी, भाजी, वेलभाजीची हेक्टरी साठ हजार म्हणजेच गुंठ्याला किमान १५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी व शेतजमीन दुरूस्तीला गुंठ्याला दोन हजार रुपये स्वतंत्रपणे द्यावेत, अशी मागणी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button