रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास केंद्र सरकारच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मंजुरी ratnagiri government engineering college

रत्नागिरी येथे प्रत्येकी ६० प्रवेश क्षमतेच्या ५ अभ्यासक्रमांसह नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास केंद्र सरकारच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी मंजुरी दिली आहे.
रत्नागिरी येथे प्रत्येकी ६० प्रवेश क्षमतेच्या ५ अभ्यासक्रमांसह नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास
मान्यता देण्यात आली आहे
या नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅट्रानिक्स इंजिनिअरींग, सिव्हील व इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरींग, आर्टिफिशिअल इंटेलिजेंन्स व डेटा सायन्स, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग आणि फुड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट हे नवे अभ्यासक्रम सुरु होणार असून प्रत्येकअभ्यासक्रमाची क्षमता ६० विद्यार्थी इतकी आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button