
रत्नागिरी मनोरुग्णालयासह राज्यातील चार मनोरुग्णालयात मनोविकार तज्ज्ञ व चिकित्सकांसह हजारभर पदे रिक्त ratnagiri mental hospital
आरोग्य विभागाच्या मानसिक आरोग्य कार्यक्रमात मनोविकार तज्ज्ञ व चिकित्सकांसह हजारभर पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
एकीकडे राज्यातील ठाणे, पुणे, नागपूर व रत्नागिरी या चारही मनोरुग्णालयांच्या नवनिर्माणासाठी पंधराशे कोटी रुपयांच्या खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे. मात्र त्याच वेळी मनोविकार तज्ज्ञांपासून आवश्यक असलेली हजारभर रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून कोणताही ठोस प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही.एका ज्येष्ठ अधिकाऱ्याच्याम्हणण्यानुसार पुणे मनोरुग्णालया मंजूर ९५४ पदांपैकी ३२६ पदे भरलेली नाहीत. ठाणे मनोरुग्णालयातील ७२३ मंजूर पदांपैकी २१६ पदे रिक्त आहेत. नागपूर येथे ३७५ पदांपैकी १५९ रिक्त तर रत्नागिरी मनोरुग्णालयातील १४४ पदांपैकी ६२ पदे भरलेली नाहीत. गंभीर बाब म्हणजे ऑगस्ट २००७ च्या मंजूर झालेल्या पदांच्या संख्येनुसार ही रिक्त पदे आहेत. २०२१ चा विचार करता मानसिक आरोग्य कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी किमान सध्या मंजूर असलेल्या २१९६ पदांऐवजी साडेतीन हजार पदांची आवश्यकता आहे. यात मनोविकार तज्ज्ञांपासून ते मानसिक आजारासाठी प्रशिक्षित परिचारिकांपासून आवश्यक कर्मचार्यांचा समावेश आहे.
www.konkantoday.com