
रत्नागिरीत आज रानभाजी महोत्सव, तालुका कृषी विभागाव्दारे आयोजन ranbhaji mohotsav ratnagiri
रत्नागिरी तालुक्याचा रानभाजी महोत्सव हा जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटीका, काजरघाटी पोमेंडी खुर्द येथे आज १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोविड १९ चे प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करुन होणार आहे.
मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे आणि असे सकस अन्न हे पावसाळ्यामध्ये निसर्गात उगवणा-या रानभाज्यांच्यात मुबलक प्रमाणात असते परंतु त्या शहरामध्ये सहज उपलब्ध होत नसल्याने या महोत्सवाव्दारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या भाज्या नैसर्गिकरित्या उगवल्या जाणा-या रानपालेभाज्या, फळभाज्या व कंद भाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला पौष्टीक असणारे घटक व असतात याची माहिती जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व शेतक-यांचा आर्थिक फायदा होण्यासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे.
रानभाज्या नैसर्गिक असल्याने त्यावर रासायनिक किटकनाशक किंवा बुरशीनाशक यांचे फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे ग्राहकांना या भाज्यांची खरेदी करता येणार आहे. तसेच रानभाज्यांचे आहारातील महत्व यावर आर्युवेदाचार्य वैद्य आशुतोष गुर्जर व प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. वैभव शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत
www.konkantoday.com