मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेचे वेळापत्रक जाहीर mumbai university
मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांतील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होणार आहेत. आज १२ ऑगस्ट २०२१ पासून विद्यार्थ्यांना uom-admissions.mu.ac.in या संकेतस्थळावरून पदव्युत्तर अभ्यासक्रमांना अर्ज सादर करता येतील. विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रणाली तयार केली आहे.
विद्यापीठातील विविध विद्याशाखानिहाय राबवण्यात येणाऱ्या एकूण ४८ पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
www.konkantoday.com