
स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की, आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर स्वतःचाच फोटो आहे दीक्षा राऊत यांचा मोदींना टोला
गेल्या अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यात आता कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोच्या मुद्द्याची भर पडली आहे. कोरोना लसीकरण पत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो असण्यावरून राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर केंद्र सरकारने दिलेल्या उत्तरावरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की गाडी चालवण्याच्या परवान्यावर तरी आपला फोटो आहे, असा टोला लगावण्यात आला आहेआपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की, आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर स्वतःचाच फोटो आहे. मास्क नसलेल्या माणसाचा फोटो शक्यतो कोरोनावर जागरूकता करू शकत नाही!, असे ट्विट दीक्षा राऊत यांनी केले आहे. दुसरीकडे, कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्याने राजकीय वादंग निर्माण झाला होता. राज्य सरकार कंपन्यांकडून लस खरेदी करत होते, तेव्हा अनेक राज्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह लसीकरण प्रमाणपत्र जारी केले होते.
www.konkantoday.com