शासनाचे आदेश मोडून बेकायदा मोर्चा काढला म्हणून माजी आमदार संजय कदम यांच्यासह साठ जणांवर गुन्हा दाखल
कोविड काळात जिल्हा प्रशासनाने घातलेले निर्बंध आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून व सोशल डिस्टंसिंगचा भंग करून लोटे औद्योगिक वसाहतीतील सीईटीपीच्या प्रवेशद्वारावर बेकायदेशीर जमाव जमवून मोर्चा काढल्याप्रकरणी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जाधव व तालुकाध्यक्ष कदम यांच्यासह सुमारे ५०-६० जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
लोटे एमआयडीसीमधील कंपन्यांनी महापुराचा गैरफायदा घेत घातक रसायने जगबुडी नदीपात्रात सोडले संबंधित कंपन्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी गुणदे फाटा ते सीईटीपी कार्यालय असा बेकायदेशीर जमाव जमवून ९ ऑगस्टला मोर्चा काढला होता. या प्रकरणी खेड पोलिसांनी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव (रा. ऐनवरे), तालुकाध्यक्ष सखाराम तुकाराम कदम (रा. धामणी) , अशित आंब्रे आदींसह सुमारे ६० राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. www.konkantoday.com