
रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पदी तुषार बाबर यांची नियुक्ती ratnagiri municipality CEO tushar babar
रत्नागिरी:- प्रशांत ठोंबरे यांच्या बदलीमुळे मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असणाऱ्या पदावर तुषार बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवस त्यांच्याकडे रनप मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार होता.
तुषार बाबर हे लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी होते व गेल्या काही महिन्यांपासून ते रत्नागिरी नगरपालिकेचे देखील काम पहात होते, आता मात्र त्यांची रत्नागिरी मुख्याधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
www.konkantoday.com