रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे १५ ऑगस्ट रोजी आत्मक्लेश आंदोलन
कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदावरील शिक्षकांना मान्यता द्यावी या मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना देण्यात आले आहे.
१०० टक्के अनुदानित असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३ ते २०१९ दरम्यानच्या वाढीव पदावरील शिक्षकांनी आपल्या पदांना मान्यता मिळण्यासाठी यापूर्वी शिक्षण विभागाला अनेकदा निवेदने दिली आहेत तसेच आझाद मैदानावर आंदोलने केली आहेत परंतु अद्यापही शासनाने कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदांना मान्यता दिलेली नाही.
www.konkantoday.com