रत्नागिरी जिल्ह्यातही १५ ऑगस्टपासून दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मिळणार?
रत्नागिरी जिह्यातील दुकाने पंधरा ऑगस्टपासून रात्री दहा वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे शासनाने राज्यात सर्वत्र दहा पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे मात्र रत्नागिरी जिल्हा तिसर्या टप्प्यात असल्यामुळे काही बंधने होती मात्र आता रत्नागिरी जिल्ह्य़ाचे करोना याबाबतची परिस्थिती सुधारत असल्याने रत्नागिरी जिल्हा दुसर्या टप्प्यात येईल असा अंदाज आहे त्यामुळे राज्यात शासनाने लागू केलेली हॉटेल व दुकानदारांसाठी रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची सवलत येथेही लागू होईल असा अंदाज आहे मात्र यासाठी दुकानदाराना व कर्मचाऱ्यांना दुसरे लस घेतल्याचे प्रमाणपत्र व कोराेनाबाबत शासनाने घालून दिलेली नियमावली पाळणे बंधनकारक असणार आहे याबाबत पालकमंत्री रत्नागिरी बाबत घोषणा करण्याची शक्यता आहे
महापूर आलेल्या भागात शासनाने याआधीच दुकानदारांना दुकाने उघडण्याबाबत सवलत दिलेली आहे
www.konkantoday.com