पोलीस भरती 2019 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) – पोलीस भरती – 2019 मधील विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी दि. 5 ऑगस्ट 2021 रोजी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांना त्यांचा पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळवण्यात आले होते. या पासवर्ड बदलणे व विकल्प निवडीसाठी दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजीपर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पोलीस भरती – 2019 मधील विविध पदांसाठी आवेदन केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील पत्रान्वये दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी वर्तमान पत्रात शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यामध्ये उमेदवारांना त्यांच्या पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच पासवर्ड सर्व उमेदवारांना बदलणे गरजेचे आहे. अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेत आपले आवेदनपत्र उघडू शकणार नाही. तसेच एसईबीसीच्या उमेदवारांना अराखीव (खुला) किंवा ईडब्ल्युएस (EWS) यापैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे. परंतू काही उमेदवारांना त्यांचा ई-मेल आयडी विसरलेला आहे किंवा अन्य कारणास्तव हरविलेला आहे, अशा प्रकारच्या तक्रारी काही उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने पुनःश्च असे कळविण्यात येते की, ज्या उमेदवारांचे ई-मेल आयडी विरसलेले असतील/ लक्षात नसतील किंवा अन्य कारणास्तव उपलब्ध नसतील तर त्यांचा ई-मेल अपडेट करण्यासाठी तसेच विकल्प देण्यासाठी सर्व उमेदवारांना दिनांक 22 ऑगस्ट 2021 चे 24 वाजेपर्यंत मुदत वाढवून देण्यात येत आहे. उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पोलीस कॉर्नर या बटनाला क्लीक करून पोलीस भरती – 2019 येथे क्लीक करावे. संबंधित घटकनिहाय संकेतस्थळावर जाऊन विकल्प द्यावा अथवा ई-मेल आयडी / पासवर्ड बदल करून घ्यावा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग पोलीस जिल्हा नियंत्रण कक्ष हेल्पलाईन क्रमांक 02362-228614, 228008 किंवा 100 क्रामांक, पोलीस भरती – 2019 युनिट I हेल्पलाईन नंबर 18002100309 येथे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button