त्या किटकनाशक कंपनीने सर्व महिलांची माफी मागावी, अन्यथा आंदोलन केले जाईल,-मनीषा कायंदे
झुरळाला घाबरून एका घरातील महिला नवऱ्याच्या समोरच घरात काम करणाऱ्या सुताराच्या अंगावर उडी मारते व तो तिला अलगद पकडतो, अशी जाहिरात करणाऱ्या एका किटकनाशक कंपनीने सर्व महिलांची माफी मागावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी दिला आहे.
या जाहिरातीचे प्रक्षेपण न थांबविल्यास या कंपनी विरोधात आंदोलन केले जाईल, तसेच अॅडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडिया कडे दाद मागितली जाईल, असेही श्रीमती कायंदे यांनी बजावले आहे. महिलांचा अवमान न करण्याची लक्ष्मणरेषा
सर्वांनीच पाळावी, असेही त्यांनी सुनावले आहे.
www.konkantoday.com