कोळकेवाडीचे लोक डोंगराखाली गेल्यानंतर आम्हाला स्थलांतरित करून येेथे जागा देणार का? ग्रामस्थांचा सवाल
दर पावसाळ्यात येणार्या नोटीशींना कंटाळून लोक अलोरे येथील शासनाच्या कॉलनीच्या जागेची घरांसाठी मागणी करत आहेत, पण शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे तिवरे, पोसरे व इतर दुर्घटनाग्रस्त लोकांना मात्र कॉलनीतील खोल्या देण्यात आल्या आहेत. मग कोळकेवाडीचे लोक डोंगराखाली गेल्यानंतर आम्हाला स्थलांतरित करून येेथे जागा देणार का? असा संतप्त सवाल येथील लोक करीत आहेत.
www.konkantoday.com