
कोल्हापूरचं नाव कलापूर करण्याची अभिनेते सचिन पिळगांवकर यांची मागणी
सचिन पिळगावकरांनी कोल्हापूरचं नाव कलापूर करण्याची मागणी केली आहे., कोल्हापूर हे त्या जागेचं नाव कधीच नव्हतं. तिथं चित्रपटसृष्टी होती. तिथं कलावंत होते. सर्व प्रकारचे कलाकार तिथं असायचे. त्यामुळं त्या जागेचं नाव कलापूर होतं. इंग्रजांनी त्या नावाला वेगळ्या पद्धतीनं उच्चारत कोल्हापूर केलं. जसं मुंबईला एवढं नाव चांगलं असताना बॉम्बे केलं. माझी इच्छा आहे की पुन्हा एकदा कोल्हापूरचं नाव कलापूर व्हायला हवं. आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणार, असं सचिन पिळगावकर म्हणाले.
www.konkantoday.com