
संगमेश्वर रामपेठ परिसरातील युवकानी मोकाट जनावरांच्या शिंगांना बसविले रेडियम
संगमेश्वर रामपेठ परिसरातील युवकानी रात्री ११ वाजेपर्यंत मोकाट सोडून दिलेल्या जनावरांच्या शिंगाना रेडियम बसविण्याचा स्तुत्य उपक्रम संयुक्त मोहिमेद्वारे राबविला आहे.
संगमेश्वर एसटी बसस्थानक, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आदी ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत मोकाट जनावरे फिरत असतात. भरधाव वेगाने जाणार्या वाहनांना जनावरे न दिसल्याने कोणत्याही क्षणी भीषण अपघात होवू शकतो. अपघात होवू नये, मध्यरात्रीपर्यंत फिरणारी मोकाट जनावरे वाहनचालकांना दिसावीत यासाठी शिंगाना रेडियम लावण्याकरिता अमोल शेट्ये, नितीन उफं बाबू शेट्ये, अर्जुन माने, अरविंद जखवाडिया, काशिनाथ जखवाडिया, कैलास भोजने, मनिष सुर्वे आदींनी पुढाकार घेतला. www.konkantoday.com