
संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे गावातील मांजरेकरवाडी व कळंबटेवाडी भूस्खलनामुळे बाधित झालेल्या भागाला भूगर्भ शास्त्रज्ञानी भेट दिली
जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे संगमेश्वर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील तळेकांटे गावातील मांजरेकरवाडी व कळंबटेवाडी भूस्खलनामुळे बाधित झाल्या आहेत. याचा येथील 31 कुटुंबांना फटका बसला असून त्यातील सुमारे 13 कुटुंबातील 42 ग्रामस्थांना जवळच्या समाज मंदिरात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. डोंगर खचलेल्या या भागाची मंगळवारी भूगर्भ शास्त्रज्ञांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबतचा अहवाल काही दिवसानंतर प्राप्त होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे हा गाव डोंगर भागामध्ये असून येथील सेंभवणे या ठिकाणी डोंगर खचला गेला आहे. परिणामी, या गावात असलेल्या दोन वाड्यांना याचा फटका बसला आहे.
www.konkantoday.com